नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू विभागात आग

नाशिक जिल्हा रुग्णालयातील

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : येथील जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू विभागाला आग लागल्याची घटना आज (दि. ३ एप्रिल) संध्याकाळी लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त केला जात आहे.

 

या शिशू विभागातील नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या विभागात असणारी एकूण ६९ बालके सुरक्षित असल्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयातून देण्यात आली आहे.

आग लागल्यानंतर तातडीने रूग्णालय प्रशासनाने नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. आग लागल्याचे कळताच तेथील कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची एकच धावपळ उडाली. नाशिक जिल्हा रूग्णालयात शॉर्ट सर्किट कशामुळे झाले आणि आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच रूग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here