पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेत शेतकऱ्यांच्या, राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना

गुलाबराव पाटील

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (ता.४ एप्रिल) वणी (जि.नाशिक) गडावर जाऊन सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी सुखी राहावा, भरपूर पाऊस पडावा आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून अधिकाधिक घरांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचावे, अशी प्रार्थना केली. सप्तश्रृंगी मातेच्या आशीर्वादाने राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, विलास चौधरी उर्फ किटू नाना, जितू पाटील, प्रशांत झंवर, सुभाष पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here