शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ नागरे यांचे चिरंजीव अभिषेक प्रमोद नागरे या तरुणाने शिर्डीतील पहिले न्यायाधीश होण्याचा मान मिळविला आहे.
इतक्या तरुण वयात न्यायाधीश होणारे ते शिर्डीतील पहिलेच यशस्वी तरुण असून त्यांच्या निवडीबद्दल शिर्डीचा अभिमान आहे.
त्यांच्या न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना मा.दत्तू शिंदे पाटील, गफ्फरखान पठाण, नानासाहेब शिंदे पाटील, कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष , हिम्मतराव होळकर, पत्रकार संजय महाजन, व मित्र परिवार उपस्थित होते.