शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : साईबाबांच्या पुण्य नगरित श्रीराम नवमी उस्तवात येणाऱ्या साई भक्तांची तहान भागवायला मनसे व जागृती युवक मंडळ च्या वतिने सार्वजनिक पाणपोई छञपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चेअरमन गोपिनाथ गोंदकर, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते ,छोटे बापु दत्ता गोविंद कोते यांच्या शुभहस्ते श्रीफल वाढून सुरू करण्यात आली.
२००४ पासुन या चौकात अखंडित साई भक्तांची सेवा करणारे जागृती युवक मंडळ आहे .श्रीराम नवमी उस्तवात मोठ्या संखेत महाराष्ट्र राज्य भरातुन साई भक्त पाई पालख्या घेऊन येतात बाबांच्या नगरित पालखी प्रथम खंडोबा मंदिरात आणली जाते व मग साई समाधी मंदिरात नेली जाते त्या मुळेच या ठिकाणी साई भक्त भर ऊन्हात विवस्त्र पायाने येतात त्यांना थंड पाणी पाजुन आम्ही छोटीशी सेवा करतो आहे असे जागृतीचे सर्वे सर्वा मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी यावेळेस सांगितले.
ही सेवा जागृतीचे सदस्य योगेश भोजणे,यश कोते, रावसाहेब देशमुख, कैलास भुजबळ,कुणाल सांबारे, प्रसाद देशमुख, साई सोनवने,ज्ञानेश्वर जगदाळे,दिपक शेलार, राहुल देशमुख, भिमा गाजरे ,राहुल गायकवाड, प्रशांत ठोंबरे, संपतराव हतांगळे, मिरा वर्मा, सुरेश सोनवणे, रूपेश देवकर ,सुनिल देशमुख,सचिन देशमुख आदी करत आहे.







