१७ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी व महसूल सहाय्यक रंगेहात सापडले

bribe
file photo

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ए सी बी) सोलापूर युनिट ने बार्शी येथील तहसील कार्यालय बार्शी श्रीमती ऐश्वर्या धनाजी शिरामे पद तलाठी वर्ग 3 नेमणूक सज्जा ताड सौंदणे तहसील कार्यालय बार्शी अंतर्गत श्री रवींद्र आगतराव भड पद महसूल सहाय्यक वर्ग 3 नेमणूक तहसील कार्यालय बार्शी ऐश्वर्या धनाजी शिरामे व रवींद्र आगतराव भड यांनी स्वतः करता १७००० रुपये रकमेची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

यातील तक्रारदार यांनी त्यांची पत्नी नावे आलेल्या शेत जमिनीचा महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वे वाटप पत्र होऊन त्यांच्या मुलाचे नावे होण्याकरता तलाठी कार्यालय ताड सौंदणे यांच्याकडे दिनांक 25/2/2025 रोजी असा प्रकार सापळा कारवाई 26/2/2025 तसेच दिनांक27/2/2025 व दिनांक 18/3/2025 रोजी तसेच यशस्वी सापळा कारवाई अर्ज सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने यातील तक्रारदार पाठपुरावा करीत असताना. यातील लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या शिरामे पद तलाठी यांनी सदर केलेल्या अर्जावर महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वे प्रस्ताव तयार करून तो तहसीलदार बार्शी यांच्याकडे मंजूर करून त्याबाबतचे आदेश काढण्याकरता स्वतः करता तसेच इतना करता असे म्हणून 17000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारली आहे.

तसेच यातील लोकसेवा रवींद्र भड पद महसूल सहाय्यक तहसील कार्यालय बार्शी याने श्रीमती ऐश्वर्या शिरामे यांचे लाच मागण्यास संमती तसेच प्रोत्साहित देऊन बेकायदेशीर वर्तन केले आहे. म्हणून यातील लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या शिरामे पद तलाठी तसेच रवींद्र फड महसूल साहेब यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7,7अ,12 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक 3/4/2025 कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे. अप्पर पोलीस अध्यक्ष डॉ शितल जानवे खराडे विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर युनिटचे गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर. पोलीस अंमलदार.पोहेकॅ अतुल घाडगे.पोहेकॅ सलीम मुल्ला.पोना स्वामी राव जाधव.पोहेकॅ प्रियंका गायकवाड चलक राहुल गायकवाड. श्याम सुरवसे लाच लुचपत प्रतिबंधक सोलापूर यांनी यशस्वी रित्या पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here