रावेर पोलीस निरीक्षक जयस्वाल यांचे बौद्ध समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य : बौद्ध समाजाची निलंबनाची मागणी

पोलीस निरीक्षक जयस्वाल

रावेर (तालुका क्राइम रिपोर्टर नगीन इंगळे) : येणारे सण उत्सव व जयंती आनंदात साजर्या व्हाव्यात यासाठी रावेर पोलीस ठाण्यातर्फे येथील पोलीस स्टेशन मधे आज सकाळी सर्व धर्मीय शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते त्यावेळी पोलीस निरीक्षक यांनी बैठकीत बौद्ध समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्या केल्याने सदर पोलीस निरीक्षकांविरूध्द कारवाई करून निलंबित करण्यात यावे असे निवेदन येथील तहसीलदार यांना देण्यात आले.

 

शहरात दरवर्षी साला बांदाप्रमाणे साजरे केले जाणारे सण व उत्सव शांततेत पार पाडले जावे यासाठी येथील पोलीस ठाण्यात शांतता कमेटीचे आयोजन पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार बंडू कापसे, रावेर न. पा.मुख्याधिकाऱी कदम साहेब शहरातील विविध समाजातील प्रतिष्ठित पदाधिकारी यांचे उपस्थितीत आज दि ३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते.
सदर बैठकीत निरीक्षक जयस्वाल यांनी बौद्ध समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले .त्यामुळे येथील बौद्ध समाज तात्काळ एकत्र येऊन सदर पोलीस निरीक्षकावर विरूध्द निवेदन तयार करून येथील तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले व तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली सदर निवेदनाच्या प्रती डी वाय एस पी फैजपूर, एस पी जळगाव, जिल्हाधिकारी जळगाव,पोलीस महासंचालक नाशिक, गृहमंत्री मंत्री व मुख्य मंत्री व अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात येणार आहे. निवेदनावर रावेर तालुक्यातील सर्व बौद्ध समाज बांधवांच्या सह्या आहेत

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here