कॉफीतून गुंगीचे औषध देत मैत्रिणीनेच चोरले दागिने

crime
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : मैत्रिणीच्या कॉफित गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केल्यानंतर कपाटातील दागिने चोरून नेणार्‍या तरूणीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून चोरीचे ५ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत आंबेगाव पठार येथील २५ वर्षीय तरूणीला अटक करण्यात आले आहे. याबाबत तिच्या मैत्रिणीने तक्रार दिली आहे. ६ मार्च रोजी सायंकाळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे निरीक्षक राहूलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विश्वास भाबड, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, प्रियंका निकम यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

तक्रारदार आणि आरोपी तरूणी या मैत्रिणी आहेत. आरोपी तरूणीने फिर्यादीच्या कॉफीत गुंगीचे औषध टाकले. ती बेशुद्ध पडल्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. आरोपीने फिर्यादीकडे चोरीची कबूली देऊन काही दिवसांत दागिने परत करते, असे सांगितले. मात्र, दागिने परत केले नाही. अखेर फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी तरूणीला पुणे स्टेशन भागातून अटक केली. तिच्याकडून ५ लाख ४६ हजारांचे दागिने जप्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here