खान्देशात उष्णतेची लाट; भुसावळात पारा ४५.८ पार

उष्णतेची लाट

भुसावळ (उपसंपादक गिरीश पवार) : गेल्या दोन दिवसांपासून खान्देशात उष्णतेची लाट निर्माण झाली असून भुसावळचा पारा ४५.८ पार गेला आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अन्य शहरामध्येही उष्णतेची लाट निर्माण झालेली आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. आज तापमानाने उच्चांक गाठत ४३.७ अंशाची मजल मारली आहे.

 

अती तापमानाने विज वापराचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे मात्र विजेचे लोडशेडींग पूर्व कल्पना न देता विज कंपनीने सुरू केले आहे. ऐन उन्हाळ्यात विजेचे लोडशेडींग दुपारी ३ ते ५ दरम्यान होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

हिट व्हेवमुळे नागरिकांना दक्षतेचा इशाराही देण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमानाची वाटचाल तीव्रतेकडे होताना दिसते. सध्यस्थितीत जिल्ह्यात राजस्थान, मध्य प्रदेश या पश्चिमोत्तर भागातून उष्णवारे वाहत आहेत. कोरड्या वातावरणामुळे तप्त उन्हाच्या झळा अधिकच जाणवत आहेत. वातावरणातील आद्रतेचे प्रमाण आता कमी झाले आहे. उष्णलहरींमुळे तापमानाच्या पार्‍यात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here