सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : येथील सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त १२ एप्रिल उत्साहात पार पडले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रावेर तालुका तहसीलदार बी.ए. कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे, सावदा मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे, सावदा तलाठी रशीद तडवी, वढोदा ग्रामपंचायत सरपंच नंदकिशोर सोनवणे, तलाठी निलेश पाटील, सकाळचे प्रतिनिधी प्रवीण पाटील, हॉटेल महिंद्राचे संचालक राहुल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे यांचे वडील भागवत तायडे आणि मातोश्री सुमन तायडे यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भंते दीपंकर यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना तहसीलदार बी.ए. कापसे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला. त्याच प्रेरणेतून सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल गोरगरीब आणि दलित समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. नवीन इमारत विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल.”
सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील म्हणाले, “सावदा, पिंपरूळ आणि आसपासच्या ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण देण्यासाठी ही संस्था वर्षानुवर्षे कार्यरत आहे. नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना बसण्याची उत्तम व्यवस्था आणि सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध होतील.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे यांनी केले, तर सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक नितीन झाल्टे यांनी केले.
यावेळी रावेर तहसीलचे सचिन पाटील, राजू सवर्णे, उमेश गाढे, विशाल जवरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय अवसरमल, रावेर तालुका अध्यक्ष विजय भोसले, राजेंद्र अटकाळे, सावदा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष नंदा बाई लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या कामिनी तायडे, लक्ष्मी मेढे, सचिन झाल्टे, दीपक बडगे, दिलीप भालेराव, योगेश लोखंडे, आनंद तायडे, निलेश बावस्कर, प्रदीप बाऱ्हे, सागर बावस्कर यांच्यासह अनेक पालक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. योगेश तायडे यांनी मानले







