चांगभलंच्या गजरात दख्खनचा राजा श्री जोतिबा देवांची चैत्री यात्रा संपन्न

श्री जोतिबा

पन्हाळा (प्रतिनिधी अनिल सांगळे) : लाखो भाविकांच्या उपस्थितीत दख्खनच्या राजा श्री जोतिबाची चैत्री यात्रा उत्साहात संपन्न झाली. शनिवारी एप्रिल यात्रेचा मुख्य दिवस. पहाटे ५ ते ६ श्रींचा शासकीय महाभिषेक पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे,प्रांताधिकारी समीर शिंगटे,देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे,श्रींचे पुजारी यांच्या हस्ते झाला.

 

यानंतर श्रींची राजेशाही थाटातील महापूजा बांधण्यात आली,यानंतर दुपारी बारा वाजता मानाच्या सासणकाठ्याचें पूजन पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश अबीटकर, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी अमोल येडगे ,तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

यानंतर सायंकाळी साडे पाच वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर श्रींचा पालखी सोहळा यमाई मंदिराकडे प्रस्थान झाला, या वेळी पालखी मार्गावर भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत चांगभलचा गजर केला,यमाई मंदिर येथे श्री यमाईदेवी(रेणुका),व जमदग्नी यांचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर यात्रेची सांगता झाली,या यात्रेला महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,आंधप्रदेश, गुजरात आदी राज्यातून सुमारे ८ लाखाच्या आसपास भाविकांनी हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here