आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीनी केली वाखरी पालखी तळ ६५ एकर नदीपात्राची पाहणी

आषाढी

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : आषाढी एकादशी सोहळा ६ जुलै २०२५ रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम पालखी सोहळ्या बरोबर तसेच अन्य संतांच्या पालखी सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी (दि.२१) ला पंढरपूर येथील विविध ठिकाणची पाहणी केली व अनुषंगिक मार्गदर्शक सूचना दिल्या.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखीतळ वाळवंट चंद्रभागा नदीपात्रात घाट तसेच पत्रा शेड येथे होणाऱ्या नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉक बाबतीत माहिती घेऊन संबंधित ठिकाणी ची पाहणी केली. त्याचबरोबर भक्ती सागर ( 65 एकर) येथे होणाऱ्या नियोजित संत नामदेव स्मारक जागेची पाणी करून भक्ती सागर येथे मोठ्या प्रमाणात सावली देणारी पानगळ कमी असणारी तसेच पाण्यात वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी यासाठी नियोजन समिती तून निधीची उपलब्ध केली जाईल असे सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमाराशीर्वाद यांनी वाखरी तळावर भाविकासाठी घेण्यात येत असलेल्या सोयी सुविधा तसेच पत्रा शेड येथे नियोजित दर्शन मंडप व स्कायवॉक माहिती दिली. त्याचप्रमाणे ६५ एकर वर भाविकासाठी देण्यात येत असलेल्या व नदी पात्रात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या सुविधाची माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार समाधान आवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक विभागाचे अधीक्षक .अभियंता संजय माळी, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रांताधिकारी सचिन इथापे ,तहसीलदार सचिन लंगोटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निंबाळकर, गट विकास अधिकारी सुशील सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here