करकंब पोलीस ठाणेची धडक कारवाई; सराफा दुकान फोडुन चोरी करणा-या दोन सराईत आरोपींना अटक

करकंब पोलीस

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | दि. २०/०८/२०२६ रोजीचे मध्यरात्री फिर्यादी ओंकार संतोष महामुणी, रा. नेवरे, ता. माळशिरस, जि. सोलापुर यांचे मालकीच्या समर्थ ज्वेलर्स, उंबरे पागे, ता. पंढरपूर येथील सोने चांदीचे दुकानाचे कोणीतरी अज्ञात चोरटयांनी शटर उचकटुन दुकानातील नऊ तोळे सोने व सव्वा किलो चांदीचे दागिने असा १६ लाख, ३१ हजार, ७८२ रूपयांचे दागिने चोरून नेलेबाबत करकंब पोलीस ठाणे, गु.र.नं. २५५/२०२६ भारतीय न्याय संहिता क. ३०५, ३३४ (४), ३(५) प्रमाणे अज्ञात आरोपींवरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

 

सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा. अतुल कुलकर्णी सोो, पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. विजय कबाडे सोो, अपर पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. प्रेरणा कट्टे सोो, अपर पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग, मा. प्रशांत डगळे सोा., सहा. पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांनी तपासाबाबत मार्गदर्शक सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाणेकडील तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीवरून आरोपी नामे १) बबलु रमेश चव्हाण, वय २५ वर्ष, मुळ रा. गिरगाव, ता. जत, जि. सांगली, सध्या रा. परिते, ता. माढा, जि. सोलापुर व २) नवनाथ संभाजी कोळी, वय ४० वर्ष, रा. परिते, ता. माढा, जि. सोलापुर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी सराफा दुकानातुन चोरीस केलेले सर्व पावणे नऊ तोळे सोन्याचे व सव्वा किलो वजनाचे चांदीचे दागिने तसेच गुन्हात वापरलेली मोटारसायकल असा एकुण १६,३१,७८२/- रूपयांचा मुदद्दे‌माल हस्तगत करण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेले दोन्हीही आरोपी सराईत गुन्हेगार असुन आरोपी नामे १) बबलु रमेश चव्हाण याचेवर यापुर्वी खुन, दरोडा, चोरी, जबरी चोरी, घरफोडी व आरोपी नामे २) नवनाथ संभाजी कोळी याचेवर जनावर चोरी, वाहन चोरी यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन नमुद आरोपींनी घोटी, ता. माढा येथे सराफा दुकान फोडुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, मा. अतुल कुलकर्णी सोा, अपर पोलीस अधीक्षक मा. विजय कबाडे सोा, अपर पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग मा. प्रेरणा कट्टे मॅडम यांच्या सुचनांप्रमाणे व मा. सहा. पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर प्रशांत डगळे सोो. यांचे मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस उप-निरीक्षक निलेश पोमणे, ग्रेपोसई/विलास रणदिवे, सपोफौ/तांबोळी, सपोफौ / लक्ष्मण भांगे, पोहेकॉ/६७२ असिफ आतार, पोहेकॉ/९९० अशोक भोसले, पोना/१४६८ हणुमंत सावंत, पोकॉ/७१५ शाम गायकवाड, पोकॉ/६६० स्वप्निल बागल, पोकॉ/२१९६ बालाजी कदम, पोकॉ/१००१ अमोल माळी, पोकॉ/१९४८ अमोल लोकरे, पोकॉ/२५९ गिरी चापोना/५९० प्रकाश नलवडे, चापोकॉ/डी ३९ महेश बोंगाणे, चापोकॉ/डी ४८ निखिल काळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here