सदर बाजार पोलिसांची मोठी कारवाई,चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त; २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सदर बाजार

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) ।  शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी एकूण ९ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत सुमारे २ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. २७ ऑगस्ट २०२६ रोजी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी जगदंबा चौक परिसरात सापळा रचला यावेळी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले.त्याची विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर चोरीच्या आणखी मोटारसायकलींचा खुलासा झाला. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ९ मोटारसायकली जप्त करून ९ गुन्हे उघडकीस आणले.

 

यामध्ये सदर बाजार पोलीस ठाण्याचे ६ एमआयडीसी पोलीस ठाण्याचा १ आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे २ गुन्हे उघडकीस आले आहेत.ही कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम.राजकुमार, उपायुक्त डॉ.प्रितम यावलकर ,सहायक पोलीस उपायुक्त विजयालक्ष्मी कुर्री वरिष्ठ पोलीस  निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शन खाली

पोलीस निरीक्षक देवेंद्रनाथ भंडारी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत पोलीस अंमलदार संतोष पापडे मुलाणी राजेश चव्हाण प्रमोद पकाले बागलकोटे उमेश चव्हाण हणमंत पुजारी विशाल बोराडे अमीन शेख सागर गुंड सोमनाथ सुरवसे काशिनाथ वाडेकर आनंद निंबाळकर अनमोल लट्ठे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here