राजारामपुरीत गणेश आगमन मिरवणुकीची सोडत जाहीर; ५३ मंडळांचा क्रम निश्चित

गणेश आगमन

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | राजारामपुरीतील मुख्य गणेश आगमन मिरवणूक २०२६ ची अधिकृत सोडत (लकी ड्रॉ) अत्यंत उत्साहात जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या या मानाच्या आणि भव्य मिरवणुकीत एकूण ५३ सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी होणार असून, सर्वांचे लक्ष लागून राहिलेला मिरवणुकीतील प्रत्येकाचा हजेरी व ποζिशन क्रम निश्चित झाला आहे.

 

सोडतीच्या राजकान्यात प्रथम मानाचे स्थान पटकावण्यात चिंतामणी कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळाने (प्रिन्स क्लब जवळ) बाजी मारली आहे. तर मिरवणुकीचा मानाचा क्रम प्रथम क्रमांक (१): चिंतामणी कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ (प्रिन्स क्लब जवळ), द्वितीय क्रमांक (२): स्पोर्ट्स नवश्या मारुती मंदिर जवळ, तृतीय क्रमांक (३): कॅ. जयसिंगराव साळुंखे क्रीडा मंडळ, जागुतीनगर, चौथा क्रमांक (४): फायटर बॉईज, राजारामपुरी १४ वी गल्ली, कोल्हापूर असा आहे.

या यंदाच्या यादीमध्ये राजारामपुरीतील विविध गल्ल्यांमधील नामांकित व लोकप्रिय मंडळांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. यामध्ये वेल्कम फ्रेंड्स सर्कल (१४ वी गल्ली), न्यू आदर्श मित्र मंडळ (९ वी गल्ली), क्रांतीवीर तरुण मंडळ (१४ वी गल्ली) आणि श्री पंत फ्रेंड्स क्रीडा मंडळ आदी मंडळांचा समावेश असून, सोडतीमधील अखेरचा म्हणजेच ५३ वा क्रमांक राजारामपुरी स्पोर्ट्स (३ री गल्ली) या मंडळाला मिळाला आहे.

राजारामपुरीतील गणेशोत्सवाचा आगमन सोहळा हा कोल्हापूरकरांसाठी नेहमीच कुतूहलाचा आणि श्रद्धेचा विषय राहिला आहे. सोडत जाहीर झाल्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सर्वच मंडळांनी आपापल्या ठरलेल्या क्रमांकांनुसार आगमन मिरवणुकीच्या जोरदार तयारीला आणि नियोजनाला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here