फैजपूर उपविभागातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव

फैजपूर

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : फैजपूर उपविभागातील पोलीस ठाणेकडे एप्रिल २०२५ या महिन्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा उपविभागाच्या क्राईम आढावा बैठकीमध्ये पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून कौतुक करण्यात आले. तसेच या अंमलदारांना प्रत्येकी १ हजार प्रोत्साहनपर बक्षीस मिळणे बाबत पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयात सादर करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेमध्ये उत्कृष्ट काम करणारे पोलीस अंमलदार यांचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यांचेमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी व दैनंदिन कामकाजामध्ये उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा निर्माण करणेसाठी” पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंच ही संकल्पना फैजपुर उपविभाग अंतर्गत राबविण्यात येत आहे.(केसीएन)निवड झालेल्या सदर अंमलदाराचे नाव व फोटो पोलीस दागेचे दर्शनी भागावर ” पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ” या मथळ्याखाली प्रदर्शित करणेबाबत नियोजित केले आहे.
तसेच उपविभागातील सर्व ” पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ” मानकऱ्यांचा एकत्रित फोटो उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील दर्शनी भागात लावण्यात येईल. एप्रिल मध्ये दि. २२ रोजी आयोजित गुन्हे बैठकीदरम्यान खालील पोलीस अंमलदार यांना “पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ” म्हणून गौरविण्यात आले आहे. यात रावेर पोलीस स्टेशन येथील पोकॉ सचिन रघुनाथ घुगे, यावल पोलीस स्टेशनकडील पोहेकॉ सुनील रमेश पाटील, निंभोरा पोलीस स्टेशन येथील पोकॉ. मयुर शरद निकम, फैजपुर पोलीस स्टेशन येथील पोहेका.सुशिला दयाराम भिलाला यांना गौरविण्यात आले.

रावेर येथील पोकॉ. ८७८ सचिन रघुनाथ घुगे यांनी रावेर पो.स्टे. कडील दाखल गुन्ह्यातील फुस लावुन पळून नेलेले अल्पवयीन अपहरित मुले व मुली यांना मध्यप्रदेश व ओडीसा राज्यातुन सुखरूप आणून त्यांचे आईवडीलांचे स्वाधीन केले कामी विशेष मदत करुन उल्लेखनिय कामगीरी केली. यावल येथील पोहेकॉ. ३३१ सुनिल रमेश पाटील यांनी त्याचेकडे तपासावर असलेले त्राग ५. भाग ६, प्रोव्हीबिशन व अकस्मात मृत्युचे एकुण २१ प्रकरणांचा मुदतीत निपटारा करून पो.स्टे. कडील एकुण प्रलंबीत ८६ मिसींग मिधील ४३ मिसींगचा निपटारा करून उल्लेखनिय कामगीरी केली आहे.
निंभोरा पोलीस स्टेशन येथील पोकॉ. ५९८ मयुर शरद निकम यांनी क्राईम अंमलदार यांना मदतनीस म्हणुन कामकाज पाहुन दरम्यान प्रतिबंधक कारवाई फायनल बॉन्ड मंजुर करुन घेवुन उल्लेखनिय कामगीरी केली..(केसीएन)फैजपुर येथे मपोहेका. ८३० सुशिला दयाराम भिलाला यांनी यावल न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून लोक अदालत मध्ये फैजपुर पो.स्टे. कडील एकुण ९२ केसेस मधील फिर्यादी व साक्षीदार यांना गुन्ह्याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन करून दोषसिध्दी मिळण्यास मोलाची कामगिरी केली आहे.
फैजपुर उपविभाग अंतर्गत पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी नागरिकांना सोजन्याची वागणूक देणे, पोलीस दलाची जनमानसातील प्रतिमा उंचावणेसाठी, वेळीच गुन्हयातील पीडीत यांची दखल घेणे, पोलीस ठाणेस दाखल होणारे गुन्हयांचा कौशल्यपूर्वक तपास करणे, प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे, दोषसिध्दीचे प्रमाण वाढविणे, जास्तीत जास्त गुन्हे प्रकटीकरण होणेसाठी सातत्याने उत्कृष्ट कर्तव्य बजावून “सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय” याप्रमाणे सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा सर्वनाश करणेसाठी सांघिक भावना वाढीस लागण्यासाठी सदरची संकल्पना राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here