सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल तालुक्यातील फैजपूर येथे ‘कौमी एकता फाऊंडेशन’च्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या अमानवीय आणि भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे.
‘कौमी एकता फाऊंडेशन’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा हल्ला केवळ पर्यटकांवरच नव्हे, तर भारताच्या शांतता, समता आणि एकतेच्या मूल्यांवर केलेला घृणास्पद कृत्य आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो आणि भारतात त्याला कोणतेही स्थान नाही. फाऊंडेशनने मृत आणि जखमी पर्यटकांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे. या निवेदनाची प्रत मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारत सरकार, दिल्ली आणि मा. उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांना सादर करण्यात आली आहे. फाऊंडेशनने तपासी यंत्रणांना दहशतवाद्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, देशवासीयांना एकजुटीने शांतता, बंधुभाव आणि सहिष्णुता कायम राखण्याचे आवाहन केले आहे. या निवेदनाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभला.
यावेळी शेख कुर्बान, हाजी शेख अब्दुल करीम सय्यद, अजगर सय्यद तुकडू, सय्यद जाविद मोहम्मद अली, जफर शे. असगर, कलीम खा. हैदर खा., शेख इरफान शेख कुतुबुद्दीन, फिरोज खान अबरार खान, आबिद शे. अजीन, अमजद खान, शेख शरीफ अब्दुल्ला, हुसेन खान आयुब खान, असलम खान गुलाम गौस खान, अजमल खान, शेख आरिफ शेख कलीम, शेख फारूक अब्दुल्ला, साजिद शेख बाबू, जाफर अली अजगर अली, अजहर खान, शेख बाहेर शेख वहाब, शेख वजीर शेख सगीर खाटीक, तौफिक खान रशीद खान, शाकीर खान शब्बीर खान, गुड्डू मेंबर सावदा यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी एकजुटीने दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. स्थानिक नागरिकांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ एकजुटीने शांतता आणि बंधुभावाचे रक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला.







