ज्यादा परताव्याच्या आमिषाने डॉक्टरला तब्बल ९३ लाखांचा गंडा

cyber-thief
file photo

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : शेअर ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरद्वारे भरपूर नफा मिळवण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टराला गंडा घालण्यात आला. डॉ. दशावतार गोपालकृष्ण बडे (वय ५६, रा. जवाहरनगर) असे या डॉक्टरचे नाव आहे. त्यांची 93 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकास अटक केली. मोहन महादेव साहू (वय ३८, रा. देवळी रोड, धुळे) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी डिसेंबर २०२४ मध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सायबर फसवणुकीतील गुन्हा उघडकीस येण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

डॉ. दशावतार बडे यांना अ‍ॅक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य मार्गदर्शक केरशी तावडिया आणि सहाय्यक राशी अरोरा यांनी कंपनीच्या गुंतवणुकीविषयी आकर्षक परताव्याचे आश्वासन दिले होते. डॉक्टरांचा विश्वास संपादन करुन त्यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. १३ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत डॉ. बडे यांनी ९३ लाख ३५ हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये भरले. मात्र, या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉ. बडे यांनी कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात बडे यांच्याकडून घेतलेली रक्कम कानपूर येथील बँकेत 38 लाख, कोलकत्ता येथील बँकेत २७ लाख आणि आसाममधील बँकेत २४ लाख रुपये ट्रान्स्फर झाले होते. सदर ट्रान्सफर रक्कम ही मोहन साहु यांच्या खात्यावर जमा झाली असून, ती रक्कम साहु यांनी काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, मोहन साहु यांच्यार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील केरशी तावडिया, राशी अरोरा आणि कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here