जळगाव जिल्ह्यातील गोरगावले बु।। च्या ऋग्वेद प्रदीप पाटीलचे योगासना स्पोर्टस्‌ चॅम्पियनशिपमध्ये सुयश

ऋग्वेद प्रदीप पाटील

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये २० देशातील योगसाधकांनी सहभाग घेतलेल्या २ ऱ्या आशियाई योगसाधना चॅम्पियनशिपमध्ये जिल्ह्यातील गोरगावले बु।। येथील ऋग्वेद प्रदीप पाटील याने योग प्रकार – आसन व रिदम प्रकारातील सादरीकरण करुन पदक पटकावले आहे. ऋग्वेद या पोलीस निरीक्षक कै.लक्ष्मण आनंदा पाटील यांचा नातू आहे.

दि. २५ ते २७ एप्रिल दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियन येथे जगातील भारतासह नेपाळ, हाँगकाँग, चीन, आफ्रिका, दुबई, जपान, तुर्कस्तास सिंगापूर यांच्यासह २० देशा पेक्षा जास्त देशाची योगसाधकांची उपस्थिती असलेल्या २ ऱ्या आशियाई योगसाधना चॅम्पियनशिपमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातील गोरगावले बु।। येथील पोलीस निरीक्षक कै.लक्ष्मण आनंदा पाटील यांचा नातू व संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी ऋग्वेद प्रदीप पाटील याने योग प्रकार – आसन व रिदम प्रकारात पदक पटकावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here