सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उप वर्गीकरण ताबडतोब लागू करा : सकल मातंग समाजाच्या जनआक्रोश मोर्चाची जनमागणी

जनआक्रोश

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या मांग, मातंग, व इतर समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मंगळवारी दिनांक २० तारखेला या समाजाचा जन आक्रोश मोर्चा च्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.

या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार विविध पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह लाखो नागरिक उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या वर्गीकरणा संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर तेलंगणा सरकारने यासाठीची अंमलबजावणी सुरू केली, त्यानंतर कर्नाटक सरकारही अंमलबजावणी करत आहे मात्र यात महाराष्ट्र सरकारने कोणत्याही हालचाली सुरू केल्या नसल्याने यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा आजही आंदोलन मुंबई आझाद मैदानात येथे घेण्यात आल्या असून पहिल्यापासून मातंग समाज हा महायुती सोबत राहिलेला आहे असे अमित गोरखे म्हणाले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब म्हणाले की मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उप वर्गीकरणाची मागणी लवकरात पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या पंधरा दिवसात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येईल व महसूल मंत्री म्हणून व पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वस्व जबाबदारी मी घेतो असे आश्वासन प्रसंगी दिले. यावेळी सकल मातंग समाजातर्फे आरक्षणाचे वर्गीकरण करून मातंग आणि त्यातील उपजातींना शिक्षण नोकरी आधी मध्ये आरक्षणाचे तरतूद करावी, तसेच सध्या सुरू असलेल्या वैद्यकीय तंत्रशिक्षण आदी सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मातंग समाजाला आरक्षणाच्या वर्गीकरण नुसार मातंग समाजाला प्रवेश आणि सवलत देण्यात यावी. आंध्र प्रदेशात मदिगा समाजाच्या विकासाच्या राबविण्यात येत असलेल्या निधीच्या सुरक्षेसाठी तेलंगणाच्या धरती वर कायदा करावा. प्रमुख मागण्या स्वीकारावे आणि त्याच्यासोबत अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येत असलेल्या निधीच्या सुरक्षेसाठी तेलंगणाच्या धरतीवर कायदा करावा. प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

त्याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे आमदार अमित गोरखे आमदार सुनील कांबळे आमदार जितेश अंतापुरकर आमदार हेमंत ओगले आमदार माजी मंत्री रमेश बागवे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सर माझी मंत्री दिलीप कांबळे माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार ससाणे माजी आमदार ससाणे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी आमदार गुंडिले साहेब माजी आमदार थोरात माजी आमदार राजू आवळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंदा गुंडले ॲड राम चव्हाण मारूती वाडेकर सुदामा धुपे पंडित सूर्यवंशी श्री मुखेडकर आदी समाजाचे नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here