सावदा रेल्वे स्टेशनवर यात्री सुविधांचा ऑनलाइन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

नरेंद्र मोदी

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : भारतातील १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८६ जिल्ह्यांमध्ये १०३ पुनर्विकसित अमृत स्थानकांचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले.

बिकानेर (राजस्थान) येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत पुनर्विकसित १०३ रेल्वे स्थानकाचे दुरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तसेच बिकानेर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रावेर लोकसभा अंतर्गत सावदा रेल्वे स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, ह्या आमदार अमोल हरिभाऊ जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व भुसावळ रेल्वे मंडळ व्यवस्थापक इती पांडे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच यावेळी परिसरातील पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६.०२.२०२४ रोजी सावदा स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली – एकूण प्रकल्प खर्च ८.११ कोटी, प्रवाशांच्या सोयी, सुलभता आणि स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करून सावदा स्थानक पुनर्विकसित करण्यात आले आहे.

सावदा स्टेशन वर पूर्ण केलेली कामे :
१. पब्लिक एड्रेस सिस्टम (एएनटीईएस आधारित)
२. कोच डिस्प्ले बोर्ड
३. प्लॅटफॉर्म क्रमांक इंडिकेटर बोर्ड
४. शौचालय महिला ०२ – प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक
५. शौचालय पुरुष ०२ – प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक
६. शौचालय अपंग ०२ – प्रत्येक प्लॅटफॉर्म वर एक
७. प्लॅटफॉर्म १ वर एक वॉटर कूलर
८. स्टील बेंच नवीन एकूण १६ नग (तीन प्रवाशांना बसण्यासाठी एक बेंच)
९. सामान्य दुसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्ष
१०. स्टेनलेस स्टील डस्टबिन एकूण ८ नग
११. प्लॅटफॉर्म पृष्ठभाग ग्रॅनाइट फिटिंग्ज
१२. फुट ओव्हर ब्रिज (पत्री शेड सह)

अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत या स्थानकांचा पुनर्विकास हा प्रवाशांच्या अनुभवात वाढ, सुलभता आणि शहरी परिदृश्याशी एकात्मता यातील एक परिवर्तनकारी पाऊल आहे. आधुनिक, समावेशक आणि प्रवासी-केंद्रित रेल्वे पायाभूत सुविधांच्या माननीय माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या दृष्टिकोनाला साकार करण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here