पारोळा तालुक्यात शासनाचा भोंगळ कारभार

पारोळा

पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) : तालुक्यातील व शहरातील जनसेवक पी जी पाटील यांनी पारोळा शहरातील रेशनिंग दुकानदारांना धरले धारेवर ५०% रेशनिंगचा माल वाटप केला नाही म्हणून दुकानदाराला विचारले असता तुमच्या दुकानात माल असून तुम्ही ग्राहकांना का देत नाही असे विचारणा केली असता सर्व दुकानदारांनी सांगितले की जळगाव वरूनच माल 28 तारखेला रात्री मिळाला व माल दोनच दिवस वाटप करण्यास मिळाले.

२९ – ३० तारखेपर्यंत आम्ही वाटप केली पण ५० टक्के माल वाटप करायचा राहून गेला त्यात आमचा दोष नाही एक तारखेला ऑनलाईन प्रक्रिया बंद झाल्यामुळे आम्ही माल देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले असता सर्व दुकानदारांना तहसीलदार उल्हास देवरे साहेब यांच्या दालनात उभे केले असता पी जी पाटील जनसेवक यांनी उल्हास देवरे साहेब व पुरवठा अधिकारी गिरासे साहेब यांना विचारले असता ४०० ते ५०० ग्राहक एका दुकानदाराकडे आहेत ते दोन दिवसात कसे वाटप करू शकता असे विचारले असता ग्राहकांचा उद्रेक होत आहे की दुकानात माल असून दुकानदार का देत नाही असे पी जी पाटील जनसेवक यांनी उल्हास देवरे साहेब यांना विचारणा केली मग आपण ऑनलाईन होत नसेल तर ऑफलाईन माल ग्राहकांना कसा देता येईल अशी विचारणा तहसीलदार उल्हास देवरे यांना करण्यात आली व त्यांनी सांगितले की मी जिल्हास्तरावर डी एस ओ यांच्याशी चर्चा करून ग्राहकांना रेशन कसे देता येईल यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले.
याप्रसंगी पी जी पाटील जनसेवक कुणाल पवार व यावेळी रेशनिंग दुकानदार प्रफुल्ल पाटील भूषण टिपरे सुरेश चौधरी दिलीप सोनकुळे भिकन महाजन शकील मिर्झा मनोहर वाणी किशोर पाठक बापू मराठे दिवाणजी खानोरे शंतनु पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here