दोंडाईचा (संतोष कोळी) – संपूर्ण देशभरात कोरोना महामारी ने लाखो लोकांच्या आळशीपणा मुळे मृत्यू होत आहे
कोरोनाची लागण होऊन होत असताना तरीदेखील दोंडाईचा व परिसरातील नागरिकांना कोरोना हा आजार काही समजून घेत नसताना अनेक सार्वजनिक ठिकाणी किराणा दुकान हॉटेल्स कापड दुकान व परिसरात फिरताना वाहन चालक देखील तोंडाला मास लावताना दिसत नाही अशा लोकांना दोंडाईचा शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवीदास पाटील संतोष लोले यांनी 22 लोकांवर दंडात्मक कारवाई 188 कलम अनुस्वार गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा दाखल केल्यानंतर दोंडाईचा तील काही वेळा पर्यंत जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे असे चर्चेला उधाण येऊ लागले आहे वरील कारवाई झाल्यानंतर लोकांमध्ये मास लावणे सोशल डिस्टिक पाडणे यात बदल झाला आहे असं नागरिकांमधून चित्र दिसून येत आहे शहरातील स्टेशन भागातील सह वरवाडे भागात परिसरातील दुकानात ग्राहक करतांना माक्स न लावणे, पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित येणे अशी कारवाई केवळ दोनच दिवसात एकुण 22 जणांवर 188 कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. सदरची कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, पोलीस नाईक विनायक खैरनार, मुकेश अहिरे, माळी, होमगार्ड टीम यांनी मेहनत घेतली तसेच यापुढेही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जास्तीत जास्त गुन्हे दाखल केले तरच आपण वाढणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होईल या करीता जनतेने देखील प्रशासनाला सहकार्य करावे तरच आपण कोरोनावर यश संपादन करु.. असे आव्हान पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड साहेब यांनी केले आहे







