सावदा येथे बांधकाम कामगारांसाठी दोन दिवसीय ऑनलाइन KYC व भांडे नोंदणी कॅम्प

सावदा

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे बांधकाम कामगारांसाठी विशेष ऑनलाइन KYC आणि भांडे नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार माननीय चंद्रकांतजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आयोजित या कॅम्पद्वारे बांधकाम कामगारांना भांडे योजनेचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. हे कॅम्प 31 मे 2025 (शनिवार) आणि 1 जून 2025 (रविवार) रोजी सकाळी 10 वाजेपासून लक्ष्मी विष्णू हॉल, सावदा येथे होणार आहे.

बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि ऑनलाइन KYC प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. बांधकाम कामगार कार्ड असलेल्या कामगारांना भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी या कॅम्पद्वारे सहजपणे पूर्ण होऊ शकेल. या योजनेमुळे कामगारांना संसार उपयोगी साहित्य मिळण्यास मदत होणार असून, त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे.

या कॅम्पचा लाभ घेण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कॅम्पच्या यशस्वीतेसाठी महायुती सरकारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, यामध्ये शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, युवा सेना प्रमुख मनीष भंगाळे, निलेश खाचणे शहर संघटक, आणि माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

आयोजकांनी सर्व बांधकाम कामगारांना या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कॅम्पद्वारे कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेला गती मिळेल आणि त्यांना भांडे योजनेचा लाभ सहज उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.सर्व बांधकाम कामगारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नोंदणी पूर्ण करावी, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here