पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) – पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडून एम पी डी ए महाराष्ट्र झोपडपट्टी दादा औषधी द्रव्य विषय गुन्हेगार धोकादायक व्यक्ती वाळू तस्कर यांच्या कृत्यांना प्रतिबंध अधिनियम 1981 कलम 3 कायदया अर्तगत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हदीतील वाळु माफीया व सराईत गुन्हेगार इसम अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे वय २८ वर्षे रा. ओझेवाडी. पंढरपूर यास एम पी डी ए कायदयाअर्तगत स्थानबध्द करून येरवाडा जेल येथे रवाना केले.
पंढरपुर तालुका पोलीस ठाणे कडून एम पी डी ए कायदयाअर्तगत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हददीतील वाळु माफीया व सराईत गुन्हेगार इसम नामे अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे वय २८ वर्षे रा. ओझेवाडी ता पंढरपुर जि सोलापुर हा पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात वास्तव्यास आहे. अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे यास लोक “बबलु” या नावाने ओळखतात. तो त्याचे साथीदारासह पंढरपुर तालुका व मंगळवेढा शहरालगतच्या परीसरातील लोकांना दमदाटी करणे, मारहाण करणे, अवैधरित्या वाळु उत्खनन करून त्याची चोरटी वाहतुक करणे, वाळू साठा करणे, सरकारी नोकरास ते करीत असलेले कामात अडथळा निर्माण करणे, शासकिय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा वारंवार भंग करून गुन्हे करण्याची त्यास सवय असून सदरची कृत्य करण्याची त्यास सवय जडलेली आहे.
अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे वय २८ वर्षे रा. ओझेवाडी ता पंढरपुर जि सोलापुर हा कुठल्याही प्रकारचा वैदय उदयोग धंदा अगर व्यवसाय करीत नाही. पंढरपुर तालुका हददीतील मौजे आझेवाडी, सरकोली, रांझणी, पुळूज, गोपाळपूर, आंबे, तारापूर ता. पंढरपूर, व मंगळवेढा शहर आसपासचे परीसरात भिमा नदी व माण नदी पात्रातुन वाळु चोरी करून त्याची विक्री करून त्यातुन मिळणारे पैशाचे जोरावर परीसरातील सर्वसामान्य जनतेत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याच्या कृत्यामुळे पंढरपुर तालुका व मंगळवेढा शहराचे आसपासचे परीसरातील सार्वजनिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणे भीतीचे वातावरण तयार करणे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रासदायक झाले होते. अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे याने पंढरपुर तालुका व शहराचे आसपासचे परीसरात दहशतीचे कृत्य करून त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा “वाळु तस्कर” म्हणुन स्वतःला सिध्द केले होते. सदर आरोपी यांचे विरुध्द पंढरपूर तालुका, मंगळवेढा व मोहोळ पोलीस ठाणे अर्तगत एकुण ११ गुन्हे दाखल असुन त्यामध्ये जबरी चोरी करणे, सरकारी कामात अढथळा करणे, स्वतःचे अस्थित्व लपवुन वालु चोरी करणे, वाळु तस्करी करणे, शासनाच्या आदेशाचा आवमान करणे व सर्व सामान्य लोकांमध्ये दहशत निर्मान करणे असे वेगवेळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते.
त्याअनुषंगाने सदर आरोपी विरुद्ध एम पी डी ए कायद्यांतर्गत कारवाई करणे व त्याच्या कृत्यांना आळा घाळणे अत्यंत आवश्यक असल्याने अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे वय २८ वर्षे रा. ओझेवाडी ता पंढरपुर जि सोलापुर यास एम.पी.डी.ए. कायदयाअतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी साो, यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साो सोलापूर यांना पाठविण्यात आलेला होता. दरम्यान मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साो सोलापूर यांनी एम पी डी ए कायदयातील तरतुदीनुसार आरोपी अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे वय २८ वर्षे रा. ओझेवाडी ता पंढरपुर जि सोलापुर याचे विरुध्द स्थानबध्दतेचा आदेश केलेप्रमाणे आरोपी यास ताब्यात घेवुन एम पी डी ए कायदयाअतर्गत कारवाई करुन त्यास येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबध्द करणेकामी रवाना करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साो सोलापूर यांचे आदेशान्वये मा. पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी साो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रितम यावलकर साो, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साो यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री टी. वाय. मुजावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश निंबाळकर नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पोसई भारत भोसले, पोसई विक्रम वडणे, सहा. फौजदार दत्तात्रय तोंडले, सहा. फौजदार विजयकुमार गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिस शेख पोहेकॉ/१४१५ मंगेश रोकडे, पोहेकॉ/१८५४ सुधिर शिंदे, पोहेकॉ/१७९२ दिपक भोसले, पोकॉ/२११६ सागर गवळी, चालक पोकॉ/१०४३ रामकृष्ण खेडकर, चालक पोकॉ/७१९हासेन नदाफ, पोकॉ/विजयकुमार आवटी, सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव वसंत कांबळे यांचे पथकाने केली आहे.







