तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

लाचलुचपत
file photo

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

लोकसेवक अरुण मारुती शेवाळे वय ५३ वर्षे, पद- ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) नेम- तहसिल कार्यालय, अक्कलकोट वर्ग ३ यातील तक्रारदार यांची वहिनी यांनी मौजे तळेवाड ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील गट क्रं. ५७/४/ब क्षेत्र १ हेक्टर शेतजमीन सह दुय्यम निबंधक, अक्कलकोट यांच्याकडील खरेदी दस्त क्रं. ३७१३/२०२५ दिनांक ०२/०६/२०२५ अन्वये रितसर खरेदी केली आहे. सदर खरेदी दस्तावरुन सात-बारा उता-यावर नोंद घेणेबाबत कळविले असता आलासे यांनी रु. ५०००/- लाचेची मागणी करुन रु. ३०००/-तडजोड अंती लाच रक्कम स्वतः स्विकारली आहे. यावरुन वर नमुद लोकसेवक यांचे विरुध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई गणेश पिंगुवाले, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर पोलीस अंमलदार एएसआय एस. व्ही. कोळी पोना संतोष नरोटे पोकॉ गजानन किणगी व चालक पोह राहुल गायकवाड सर्व नेमणुक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here