पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : न्यू बालाजी नगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यमित्र ईश्वर बाबा ठाकुर यांचा नुकताच पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पारोळा शहरासह तालुक्यातील आपत्कालीन परिस्थिती असो किंवा कायदा सुव्यवस्था चा प्रश्न ईश्वर बाबा ठाकुर हे नेहमी पोलिस प्रशासनाला योग्यतोपरीत मदत करित असतात गंभिर अपघाततिल रुग्णांना तातडिने रूग्णालया पर्यंत पोहचुवुन त्यानी अनेकाचे प्रान वाचविले आहेत. सन्मान करते वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते व पोलिस अधिकारी उपस्थित होते.








