ओन्ली समाजसेवा संस्थेतर्फे वारकरी दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व महाप्रसादाचे आयोजन

ओन्ली समाजसेवा

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्यावतीने शिवनी पिसा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना गेली तीन वर्ष ओन्ली समाजसेवेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते .

संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांच्या निवासस्थानी टाळ मृदुंगाच्या तालात रामकृष्ण हरीच्या गजरात दिंडीचे आगमन होते संस्थेच्या महिला व सदस्या कडून दिंडीतील विणेकरी यांची चरण पूजा करून दिंडीचे स्वागत करण्यात आले यावर्षी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल रामराव वाणी यांच्या विचारातून दिंडीतील वारकरी यांना मोफत तपासणी व औषध गोळ्या वाटप करण्यात आले हे शिबिर ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी व डॉक्टर हिरेमठ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.

ओन्ली समाजसेवाया शिबिरास डॉ. स्नेहल निनाद माढेकर, डॉ. गौरी कौवल्य गायकवाड, डॉ. ओंकार रणसुर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले या दिंडीतील चालक-मालक ह-भ-प- गजानन नाना पिसे महाराज, पाटील महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याचा आढावा पाहून हृदयस्पर्शी आशीर्वाद रुपी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात संपूर्ण वातावरण आनंदीमय झाले होते डॉ. स्नेहल माढेकर मॅडम, डॉ. गौरी गायकवाड मॅडम, डॉक्टर ओंकार रणसुर सर व संस्थेचे सदस्य यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर 250 वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला.
या महाप्रसादासाठी संस्थेतील पदाधिकारी सदस्य, महिला सदस्य मित्रपरिवार संस्थेवर प्रेम करत असलेले तसेच न नाव टाकण्याच्या अटीवर दान देणारे या महाप्रसादात त्यांचे ही फार मोठा योगदान आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी सदस्य, महिला पदाधिकारी सदस्य मित्रपरिवार वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी तसेच पत्रकार बंधू भगिनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी मांडले यापुढेही असेच आपले सहकार्य असावे अशी भावनिक साध व सर्वांचे आभार मानून वारकरी दिंडीस पुढील प्रवासात शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here