पंढरपुरात सोनार समाजातर्फे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ‘हरिहर साक्षात्कार दिन’ उत्साहात साजरा

सोनार समाजा

पंढरपूर ( रिपोर्टर प्रकाश इंगोले) | दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात समस्त सोनार समाज बांधवांच्या वतीने ‘हरिहर साक्षात्कार दिन’ अत्यंत भक्तीभावात साजरा करण्यात आला. भगवान श्री विठ्ठलाच्या कटीमध्ये सदेह विलीन झालेले एकमेव संत म्हणून संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ओळख आहे. या दिनानिमित्त संत नरहरी महाराज व पांडुरंगाची मूर्तीभेट तसेच पादुका दर्शन सोहळा पार पडला.

संत नरहरी महाराज हे प्रारंभी शिवोपासक होते. सावकाराच्या नवसाच्या करदोड्याच्या प्रसंगानंतर त्यांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली आणि त्यांचा शैव पंथाकडून वैष्णव पंथाकडे प्रवास सुरू झाला. ‘हरी आणि हर एकच आहेत’ असा दिव्य साक्षात्कार स्वतः पांडुरंगाने नरहरी महाराजांना पुत्रदा एकादशीच्या दिवशी घडवला होता. याच ऐतिहासिक व आध्यात्मिक घटनेच्या स्मरणार्थ हा साक्षात्कार दिन मंदिरात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यासाठी राष्ट्रीय भारतीय नरहरी सेना संस्थापक: मा. काकासाहेब बुराडे, सोनार सेवा महासंघ संस्थापक: मा. चंद्रकांतजी डहाळे (परभणी), समस्त सोनार समाज पंढरपूर: अध्यक्ष श्री. व सौ. जगदीश शेठ मधुकर जोजारे, उपाध्यक्ष श्री. व सौ. लंकेशदादा काकासाहेब बुराडे, संस्था उपाध्यक्ष मा. संजयशेठ ढाळे, सचिव मा. सोमनाथ (आप्पा) अष्टेकर यांच्यासह ‘हरितारण’ ग्रंथाचे लेखक मा. संतोषशेठ शहाणे (परभणी), अरुणशेठ राजूरकर, राजूमामा अष्टेकर, दीपक अष्टेकर, ओम जोजारे, रणवीर बुराडे यांच्यासह राज्यभरातून सोनार समाजातील मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विठ्ठलनामाचा आणि संत नरहरी महाराजांचा जयघोष करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here