आंदोलनादरम्यान सोमेश्वर नगरमधील नागरिकांनी ठोकले सावदा नगरपालिकेला कुलूप

सोमेश्वर नगर

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : येथील दिनांक एक जुलै रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास सोमेश्वर नगर वासियांचा सावदा पालिकेवर मोर्चा धडकला यावेळी सुमारे १०० महिला पुरुष यांनी एक तासभर ठिय्या आंदोलन केले.

येथील कर्मचारी प्रमोद चौधरी यांना काॅलनीतील समस्या पथदिवे,रस्ते, स्वछता,आदि मुलभूत सुविधा बाबत निवेदन देत २ दिवसात समस्या सोडविण्याची मागणी रहिवासी यांनी केली परंतु महिलांनी पालिकेचे मुख्याधिकारी जोपर्यंत आमच्या समोर येणार नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यासाठी मुख्याधिकारी न आल्याने, संतप्त महिलांनी नगरपालिकेत कुलूप लावून सर्व कर्मचाऱ्यांना वेठीस धरले.
यावेळी माजी नगरसेवक राजेश वानखेडे यांनी येथे भेट दिली असता सोमेश्वर नगर मधील नागरिकांची चर्चा करून सर्वांची समजूत काढत पालिकेचे कुलूप काढण्यास सांगितले व आपण सर्व मिळून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर आंदोलकांनी पालिकेचे कुलूप काढले यावेळी दिपाली ठोसर, मनिषा जैन, संगीता सोनवणे, सिमरन वानखेडे, मिनाक्षी ठोसरे,पूजा जंगले, लीलाधर ठोसर, कुणाल तायडे, धनराज पाटील, श्रीधर लोखंडे, दिलीप तडवी,रोशन चतुर, कैलास लवगंडे, संतोष तायडे, दिपक भारंबे, यासह नगरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here