ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : येथील ठाणे पूर्व स्टेशन लगत असलेल्या हॉटेल समोरील रोडवर कोपरी पूर्व येथील एक इसम चरस गि-हाईकांना विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी गुन्हे शाखा वागळे युनिट ५ यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ कारवाई करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट ५ चे सपोनिरी भूषण शिंदे व पोलीस अंमलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्टेशनसमोर सापळा रचून मोहंमद आफताब आलम मोहंमत सलीम अख्तर (वय ३४, रा.बबनगाव, तहसिल नायगाव, जि.छपरा, बिहार) याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून ३० लाख ९६ हजार रुपये किंमतीचा ३ किलो ९६ ग्रॅम चरस व ११ हजार ५०० रुपयांचा मोबाईल व रोख रक्कम असा ३१ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत त्याच्याविरुध्द कोपरी पोलीस स्टेशनला गु.र.नं.५०२/२०२५ एनडीपीएस कलम ८ (क), २० (२) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि पल्लवी ढगे पाटील या करीत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस अायुक्त गुन्हे डॉ.पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध १ गुन्हे शाखा शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणेचे पोनि सलील भोसले, पोनि नितीन पाटील, सपोनि भूषण शिंदे, सपोनि शरद पाटील, मसपोनि पल्लवी ढगे पाटील, पोउनि तुषार माने, सपोउपनि राजेंद्र चौधरी, पोहवा विजय काटकर, सुनिल निकम, संदीप शिंदे, सुशांत पालांडे, पोह रावते, ज्ञानेश्वर जाधव, पोशि शेडके, यश यादव, रघुनाथ गार्डे या पथकाने यशस्वी केली आहे.







