पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सात गुन्हेगारांना मंगळवारी (ता. १) पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हे आदेश दिले.
चिंचवड हद्दीतील स्वप्नील ऊर्फ अब्या संतोष भोसले (वय २५), आदित्य आवळे (वय २०, दोघेही रा. बाबुभंडारी चौक, आनंदनगर झोपडपट्टी), निगडी हद्दीतील आरमान ऊर्फ डायमंड मुन्ना खान (वय २३ वर्षे, रा. अंकुश चौक, ओटास्किम), हृतिक अनिल जाधव (वय २५, रा. दत्तवाडी), दापोडी हद्दीतील समीर जयवंत खैरनार (वय २६, रा. काटेचाळ) यांना दोन वर्षांसाठी तर निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद ऊर्फ लंब्या लक्ष्मण सुतार (वय २६, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यास चार महिन्यांसाठी, तसेच श्रीकांत अंकुश वाघमारे (वय २६, रा. भोंडवेनगर, वाल्हेकरवाडी) याला एक वर्षासाठी तडीपार केले आहे.







