पोदार कन्सल्टन्सी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम

पोदार कन्सल्टन्सी

पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : युनिव्हर्सल इंटरनॅशनल स्कूल रन बाय पोदार कन्सल्टन्सी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आले.त्यात लहान चिमुकले यांनी विठ्ठल रुक्मिणी यांचा वेश परिधान केला.

शनिवार (दि. ५) ला युनिव्हर्सल इंटरनॅशनल स्कूल पारोला आषाढी उत्सव आषाढी उत्सवाचे सादरीकरण वारकरी संप्रदायाचा वारसा जपून मुलांच्या वेगवेगळ्या वेशभूषा व वारकरी संप्रदायाचा नृत्य अभंग व पालखी सोहळा चे आयोजन करण्यात आले होते तरी त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला व दिलेले पात्र योग्यरित्या सादर केले.
तसेच पारंपारिक रीतीने टाळांच्या गजरात पालखीचे शाळेच्या आवारात मिरवणूक काढण्यात आली व मोठ्या थाटामाटाने विठू रुक्माई यांचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती नेवले मॅडम उपस्थित होत्या.तसेच प्रिन्सिपल गायत्री गुजराती वाईस प्रिन्सिपल स्मिता मोरे मॅडम व सर्व सहकारी शिक्षक व शिक्षिका यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here