एरंडोल बसस्टॅण्डजवळील हॉटेल मैत्री कॅफेवर पोलिसांची कारवाई

हॉटेल मैत्री कॅफे

जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन पाटील) : एरंडोल पोलीस स्टेशनला गोपनीय माहिती मिळाली की, शहरातील बसस्टॅण्डसमोर असलेल्या गोटू महाजन कॉम्प्लेक्समध्ये हॉटेल मैत्री कॅफे येथे कॉलेजच्या अल्पवयीन मुलामुलींना अश्लील कृत्य करण्यास कॅफे चालक परवानगी देतात. या माहितीवर तात्काळ कारवाई करत आज (दि.९) एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोकाँ संजय पाटील, पोहेकॉ किरण पाटील, पोना दिपक पाटील, मपोना वैशाली पाटील यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले.

 

हॉटेल मैत्री कॅफे येथे जावून खात्री केली असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास काही तरुण तरुणी असल्याचे दिसून आले. पोलीसांनी पंचासह हॉटेल मैत्री कॅफे येथे पाहणी केली असता, कॅफे चालक रविंद्र ुदवकर पाटील (वय २३, रा.जवखेडा, ता.एरंडोल) याने ग्राहकांना छोटे छोटे पार्टीशनचे कम्पार्टमेंट तयार करुन तेथे अश्लील चाळे किंवा असभ्या वर्तन करण्याकरिता कॅफे मधील लाईट घालवणे, ग्राहकांना एकांत देणे असे कृत्य करत असल्याचे आढळून आले.
सदर ठिकाणी तपासणी केली असता, दोन वेगवेगळ्या कम्पार्टमेंटमध्ये तरुण व तरुणी असभ्य वर्तन करताना आढळून आले. त्यांच्या वयाची खात्री केली असता ते १८ वर्षापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. सदर तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची परवानगी असल्याबाबत विचारणा केली असता, कॅफे चालकाने परवानगी नसल्याबाबत सांगितले. सदर ठिकाणी अश्लील कृत्य करण्यास मुभा देत असल्याचे जागा व वस्तू उपलब्ध करून देत असल्याने या ठिकाणीचा पंचनामा पोहेकॉ किरण पाटील यांनी पंचासमक्ष केला. कॅफेचालक रविंद्र पाटील याला ताब्यात घेतले आहे.त्याच्याविरुध्द पोकॉ संजय पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here