पारोळा (क्राईम रिपोर्टर अरविंद जाधव) : तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत तहसील कार्यालय येथील सभागृहात पार पडली, यासाठी प्रांत मनीषकुमार गायकवाड, नायब तहसीलदार श्रीमती आश्विनी मराठे, महसूल सहायक गोकुळ शिसोदे, अमोल शिरसाठ उपस्थित होते.
दुपारी २ वाजता प्रांत मनीषकुमार गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. यासाठी मनश्री शशिकांत परदेशी वय ८ वर्षे हिच्या हस्ते आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्यात. पारोळा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.
सर्वसाधारण- हिवरखेडे सिम (यापूर्वीच आरक्षण निश्चित), भोंडणदिगर-स्त्री, विचखेडे स्त्री, पिंपळकोठे-स्त्री, देवगाव-स्त्री, ढोली-स्त्री, मुंदाणे प्र.अ. स्त्री, बाहुटे स्त्री, बोदर्डे स्त्री, लोणी खु-स्त्री, पळासखेडे सिम-स्त्री, वेल्हाणे खु-स्त्री, शेळावे बु-स्त्री, बाभळेनाग स्त्री, वाघरे-स्त्री, करंजी बु-स्त्री, तरवाडे खु-स्त्री, सावळखेडे – स्त्री, उंदिरखेडे स्त्री, इंधवे-स्त्री, चिखलोड बुद्रुक-जनरल, सावखेडे मराठ-स्त्री, कराडी-जनरल, करमाड बुद्रुक-जनरल, विटनेर- जनरल, सांगवी-जनरल, मुंदाणे प्र. ऊ- जनरल, भिलाली-स्त्री, तरडी-जनरल, सुमठाणे-जनरल, दळवेल-जनरल, राजवड-जनरल, आंबा पिंपरी-जनरल, मेहु-जनरल, मोंढाळे प्र.ऊ जनरल, कंकराज जनरल, कोळपिपंरी जनरल, पोपटनगर जनरल, मोहाडी-जनरल, सावखेडे तुर्क-स्त्री, वसंतनगर-जनरल, कन्हेरे – जनरल, उडणी दिगर-जनरल, हिरापूर-जनरल, बोळे जनरल, जिराळी-जनरल.
अनुसूचित जाती – सबगव्हाण प्र.अ स्त्री, तामसवाडी-स्त्री, चोरवड जनरल, बहादरपुर जनरल. अनुसूचित जमाती टेहू-जनरल, म्हसवे जनरल, वसंतवाडी-जनरल, शेवगे प्र.ब-जनरल, शिवरेदीगर जनरल, टोळी स्त्री, जोगलखेडे स्त्री, पळासखेडे बु-स्त्री, शिरसमणी-स्त्री, सार्वे बु-स्त्री, आडगाव-स्त्री.
नागरिकांचा मागास प्रवर्ग मोंढाळे प्र.अ. (पूर्वीचे आरक्षण कायम), धुळपिंप्री स्त्री, भोकरबारी-स्त्री, खोलसर-स्त्री, करमाड खु-स्त्री, सावखेडे होळ-स्त्री, शेवगे बु. स्त्री, नगांव-स्त्री, मोरफळ जनरल, रत्नापिंप्री-जनरल, टिटवी जनरल, चहुत्रे-जनरल, शिरसोदे जनरल, खेडीढोक-जनरल, पिंप्री प्र. उत्राण-जनरल, भोलाणे-जनरल, शेळावे खु.-जनरल, मंगरुळ-जनरल, हनुमंतखेडे स्त्री, महाळपूर-स्त्री, रताळे स्त्री, लोणी सिम-स्त्री, लोणी बुद्रुक- स्त्री, वरील प्रमाणे पारोळा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे.
या कामी पहिल्या सत्रात तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण विगतवारी काढण्यात आली होती. दुपारच्या सत्रात एरंडोल उपविभागीय महसूल अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ८४ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण काढण्यात आले. दोघेही प्रक्रियेमध्ये मनश्री शशिकांत परदेशी व आठ वर्ष या विद्यार्थिनीने चिठ्ठ्या काढल्या. याप्रसंगी नायब तहसीलदार अश्विनी मराठे हे उपस्थित होते त्यांना अमोल शिरसाठ यांनी सहकार्य केले.







