भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि आय बी एम यांच्यात सामंजस्य करार

भारती विद्यापीठ

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : शैक्षणिक ज्ञान आणि औद्योगिक गरजांमधील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि आय बी एम कंपनीच्या आय सी ई (इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशन) उपक्रमाअंतर्गत सामंजस्य करार करण्यात आला. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यकालीन कौशल्यांनी समृद्ध केलेले उद्योगाभिमुख पदवी आणि अभ्यासक्रम मिळणार आहेत.

भारती विद्यापीठ परिसरात ७ जुलै २०२५ रोजी हा सामंजस्य करार झाला.याप्रसंगी संजीव मेहता (सल्लागार व प्रमुख, कार्यक्रम विकास,आयबीएम,आय सी ई), धवल शाह (संस्थापक व सी ई ओ, डेटागामी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रा. लि.), संजय डागा (पार्टनर व डायरेक्टर – सेल्स, डेटागामी), श्वेता शाह (वरिष्ठ व्यवस्थापक, अकॅडेमिया रिलेशन, डेटागामी), डॉ.विवेक सावजी (कुलगुरू,भारती विद्यापीठ),जी.जयकुमार (कुलसचिव,भारती विद्यापीठ), प्रविण पाटील (शैक्षणिक व प्रशासकीय संचालक,भारती विद्यापीठ),राजेश प्रसाद (प्राचार्य, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय ), सुहास एच. पाटील (अधिष्ठाता,भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय), डॉ.सचिन चव्हाण (उपप्राचार्य – भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय),डॉ.सुनीता जाधव (उपप्राचार्य भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय), डॉ.संदीप वंजाळे (प्रमुख, संगणक अभियांत्रिकी व आय टी विभाग, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय) आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते
कार्यक्रमात बोलताना विठ्ठल माड्याळकर म्हणाले, “तंत्रज्ञान व्यावसायिकांची मोठी गरज आहे. आय बी एम आय सी ई उपक्रमामुळे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय मधील विद्यार्थी ही गरज पूर्ण करू शकतील.”संजीव मेहता यांनी आय सी ई कार्यक्रमांची शैक्षणिक रचना स्पष्ट केली: “हे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या मंजुरीनंतर सह-विकसित करण्यात आले आहेत. आय बी एमच्या डिजिटल कोर्सवेअरद्वारे समृद्ध केले गेले आहेत. विद्यार्थी जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आय बी एम डिजिटल बॅजेस प्राप्त करतील. शिक्षकांसाठी टी थ्री ट्रेनिंग, रिमोट मेंटरिंग व लॅब सहाय्य मिळेल. अभ्यासक्रम प्रात्यक्षिक, प्रकल्पाधारित आणि जागतिक रोजगार योग्यतेला अनुसरून असतील.” डॉ.विवेक सावजी यांनी सांगितले, “आय बी एम सोबतचा हा करार शिक्षणात गुणवत्ता वाढवण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक गरजांशी समन्वय साधण्याच्या आमच्या उद्दिष्टांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.” जी. जयकुमार म्हणाले, “या करारामुळे भविष्यात महाविद्यालयात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होतो. हे केंद्र औद्योगिक समस्यांवर उपाय शोधेल व समाजसेवा करेल.”
प्रविण पाटील आणि राजेश प्रसाद यांनी सांगितले की, “हा उपक्रम अभ्यासक्रम संरचना, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावर तयारी यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे.”आय बी एम आय सी ई कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना जागतिक मान्यता असलेले डिजिटल बॅजेस दिले जातील, जे त्यांच्या कौशल्यांची खात्री देतील आणि रोजगाराच्या संधी वाढवतील.या अभ्यासक्रमांमध्ये ए आय, डेटा सायन्स, क्लाउड कंप्युटिंग, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. आय बी एमचे एल एम एस, डिजिटल टूलकिट्स आणि कोलॅबोरेशन प्लॅटफॉर्म्सद्वारे विद्यार्थ्यांना वर्कशॉप्स, हॅकाथॉन, पोस्टर प्रेझेंटेशन्स आणि उद्योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here