पारोळा येथील जैन माध्यमिक विद्यालयात मुलींच्या सुरक्षेबाबत कार्यक्रम

पारोळा

पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : आज दि. 11.07.2025 रोजी 13:00 वा ते 14:30 वाजे पावतो पारोळा पोलीस स्टेशन हद्दीमधील श्री. बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित डाँ. व्ही. एम. जैन माध्यमिक विद्यालय पारोळा येथे मुलींची सुरक्षा बाबत कार्यक्रम घेतला.

त्यामध्ये विद्यार्थींनी आपली काळजी कशी घ्यायची , स्वतः ची सुरक्षितता कशी करायची , वाहतुकी चे नियम कसे पाळायचे , मुलींनी आपली काळजी कशी घ्यावी , सायबर क्राईम,डायल – 112 बाबत माहिती दिली तसेच सोशल मिडीया चा आपण किती सावधानते ने वापर करावा, गुड टच बँड टच बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपल्या गुरुजनांना अवगत करावे व पोलीस स्टेशन येथे तात्काळ संपर्क करावा असे आवाहन केले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांचा गुरु पोर्णिमेच्या निमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here