जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर अशोक तायडे) : आज (दि.१२) श्री प्रसाद फाउंडेशन कोळवद, तर्फे भालोद ता यावल येथे आरोग्य विषयक व आर्थिक साक्षरता विषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. संस्थे चे प्रतिनिधी अशोक तायडे यांनी HIV, STI, गुप्त रोग तसेच व्यसन मुक्ती केंद्र विषयी मार्ग दर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष सचिन बरडे यांनी आर्थिक साक्षरता तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व बांधकाम कामगार कल्याण योजना व बालसंगोपन या शासकीय योजने विषयी सखोल माहिती दिली कार्यक्रमासाठी उपस्थित उपाध्यक्ष संदीप पाचपोळे, संजय टोकरे बचत गट प्रतिनिधी नेहा जावळे कविता कोळी तसेच आभार पदर्शन अरुणा संदीप कोळी यांनी केले कार्यक्रमाला महिला बचत गट व इतर महिंलांची उपस्थिती होती.







