जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर अशोक तायडे) : जिल्ह्यातील अमळनेर येथे रविवारी (दि.१३) रोजी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविधता संघटनांच्या वतीने संयुक्तरित्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने यानिमित्त *ऑल इंडिया संविधान आर्मी. तर्फे संविधान गौरव तिरंगा रॅली काढण्यात आली* आयोजन करण्यात आले आहे व रॅली संपल्यानंतर संविधान गौरव तिरंगा रॅली व संकल्प मेळावा दुपारी दोन वाजता साने गुरुजी विद्यालय धुळे रोड प्रांत कार्यालय शेजारी अंमळनेर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या संविधानवादी मेळाव्यामध्ये खानदेश ची मुलुख मैदानी तोफ, ,आंदोलन पुरुष, संविधान बचाव चळवळीचे प्रणेते, कामगार नेते जगन भाऊ सोनवणे (बीए एलएलबी) राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया संविधान आर्मी यांची तोफ आज अमळनेर मध्ये धडाडली.. व त्यांनी आंदोलनाची घोषणा जाहीर केली आहे … तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शिवश्री अशोक दादा पवार यांचे उपस्थिती लाभली व त्यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले,यावेळी सर्व संविधानवादी ,आरक्षणवादी , आंबेडकरवादी जनतेने त्यांचे क्रांतिकारी विचार ऐकण्यासाठी मेळाव्यात सहभागी झाले होते.. अशी माहिती ऑल इंडिया संविधान आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष देशभक्त सविधान रक्षक सैनिक सुभाष दादा आगळे अंमळनेर तसेच ऑल इंडिया यांनी दिली आहे त्यांच्या सोबत संविधान आर्मी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ सुनंदाताई पान पाटील अमळनेर तसेच अमळनेर शहराध्यक्ष संविधान आर्मी अनिल रायसिंग व युवा तालुकाध्यक्ष अमळनेर संविधान आर्मी रवींद्र वानखेडे तसेच संविधान आर्मी ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोहर पाटील तसेच संविधान आर्मी वकील आघाडी जिल्हाध्यक्ष एडवोकेट शिवकुमार ससाने इत्यादींनी केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट शिवकुमार ससाने संविधान आर्मी वकील आघाडी अध्यक्ष यांनी केले तर आभार महिला आघाडी अध्यक्ष सौ सुनंदाताई पान पाटील संविधान आर्मी यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनापती तसेच स्वराज्य रक्षक शूर शिव छत्रपती यांना संविधानाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण केले तसेच यावेळी कामगार नेते जगन सोनवणे यांचा व भुसावळ नगरसेविका माजी पंचायत समिती सदस्य सौ पुष्पाताई जगन सोनवणे यांना तिरंगा ध्वज व संविधानाची परत देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच त्यानंतर सामूहिकरीत्या संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक रित्या वाचन करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.







