नटसम्राट बालगंधर्व यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेतील नाट्य कलाकारांतर्फे आदरांजली

नटसम्राट बालगंधर्व

कोल्हापूर (प्रतिनिधी सतिश चव्हाण) : नटसम्राट नारायण राजहंस तथा बालगंधर्व यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेतील नाट्य रसिक नाट्य कलाकार रंगकर्मी आणि विविध संस्था यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली महानगरपालिकेच्या उपयुक्त संस्कृती पाटील यांच्या हस्ते नटसम्राट बालगंधर्व यांच्या बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मूळच्या मिरजेच्या असलेल्या आणि सद्यस्थितीत पुण्यात स्थायिक असलेल्या प्रसिद्ध गायिका अश्विनी गोखले नवरे यांनी जय शारदे वाघेश्वरी हे पद यावेळी सादर केले. सतरंग सहयोगी कला मंचचे अध्यक्ष ओमकार शुक्ल नाट्यगणचे अध्यक्ष बाळासाहेब बरगाले सुप्रसिद्ध नाट्यचित्र कलाकार निर्माते प्रशांत गोखले दिगंबर कुलकर्णी विनायक इंगळे ज्येष्ठ लेखक रंगकर्मी श्रीराम कुलकर्णी विवेक गोखले धीरज पलसे चैतन्य तांबोळकर कविता घारे आकांक्षा जोशी सुरज कांबळे महापालिकेचे मालमत्ता विभागाचे रवींद्र तांदळे उपस्थित होते. यावेळी कुमारी आकांक्षा जोशी याचा सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर निवेदिका म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here