कोल्हापूर (प्रतिनिधी सतिश चव्हाण) : इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर तसेच अग्निशमन अधिकारी सौरभ साळूंके आणि वाहन अधिक्षक प्रशांत आरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने प्रशासकीय गतिमानता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
दिनांक ०१/०५/२०२५ ते दिनांक १५/०८/२०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता प्रशिक्षण कार्यशाळेत अभियान अंतर्गत राबविण्यात येत्या १०० दिवसांचा प्राधान्यकृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने मंगळवारी (दि.१५) इचलकरंजी येथे श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे ४०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत माहिती देण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग म्हणून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अत्यावश्यक साहित्य सामग्रींचे या विषयी सविस्तर माहिती स्वयसेवकांस देण्यात आली,महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांनी आपत्ती निवारणाकरिता ४०० शिक्षित स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले,तसेच त्या प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या शंका-प्रश्नांचे ही निराकरण करणेत आले.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचे शंकर पोवार सर आणि सह.टिम, D.K.A.S.C. काॅलेजचे विनायक भोई सर आणि टिम, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे हायस्कूलचे मुल्लाणी सर आणि टिम, गोविंदराव हायस्कूलचे राहुल सर आणि टिम, B.S.यादव ॲकॅडमीचे यादव सर आणि टिम, माणूसकी फाऊंडेशनचे रमल आमणे सर आणि टिम, पोलिस बॉईज असोसिएशनचे सतिश चव्हाण आणि टिम, वीर रेस्क्यु फोर्सचे रूपेश खरवार सर आणि टिम, ए.जे.फाऊंडेशनचे आबोली जीगजिनी मॅडम आणि टिम तसेच महापालिकेचे अग्निशमन दलाकडील फायर फायटर्स जवान यांच्यासह अनेक स्वयंसेवक मुला- मुलींनी आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.







