सैय्यद पिंप्रीत दिवसाढवळ्या दरोडा टाकणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

दरोडा

नाशिक (उपसंपादक संतोष रायचदे) : सैय्यद पिंप्रीत दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीच्या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर आणि नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपी योगेशकुमार तायडे (वय ४३, रा.रिहल हिल, खडकी, पुणे, मूळ रा. जामनेर रोड, भुसावळ, जि.जळगाव)याला बेड्या ठोकल्या.

आरोपी योगेशकुमार तायडे याला सैय्यद पिंप्री येथील धनंजय झोमान यांचे बंद दरवाजाचे कडीकोंडा तोंडून बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरुन नेल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.
त्याच्या ताब्यातून गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले सोन्याचांदीच्या दागिन्यांपैकी ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, रोख ३४ हजार ५०० रुपये, गुन्ह्यात वापरलेली यामाहा कंपनीची मोटारसायकल व हेल्मेट, मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ६८ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या आरोपीवर यापूर्वी खडकी पोलीस ठाण्यात खून व शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उपनगर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथेदेखील चोरीचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीकडून वरील गुन्ह्याचे तपासात आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या पथकात पोउनि अश्विनी मोरे, पोलीस अंमलदार निलेश मराठे, योगेश पाटील, अरुण रहिरे, नवनाथ आडके, नंदु सानप, संतोष घोडेराव, विकास कराड, तसेच स्थागुशाचे पोहवा संदिप नागपुरे, सचिन गवळी, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, आणि नितीन गांगुर्डे यांचा समावेश होता. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर खून आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत देखील गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ उपविभाग वासुदेव देसले यांनी देखील या प्रकरणात मोलाचे योगदान दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here