पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची मोठी कारवाई; चोरट्यांकडून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुका पोलीस

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावी दिनांक ३० जूनला फिर्यादी रुपेश अजितराव देवकते (वय २७, राहणार घोसाळे) यांच्या मालकीच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पाण्याच्या मोटारी चोरीस गेल्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 544/25 BN S 303 अन्वे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याच्या तपास कामी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शेतकऱ्याच्या मोटारी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण चार आरोपींचे नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून एकूण पाच शेती पंपाच्या पाण्याच्या मोटारी किंमत रुपये २ लाख १५ हजार व एक मोटरसायकल असा एकूण २ लाख ३५ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केलेला असून आणखीन सदर मोठा चोरीच्या गुन्हा मध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस तपास करत आहेत
तसेच वेळापूर येथील आषाढी वारीच्या वेळेस २ जुलै २०२५ रोजी महिंद्रा कंपनीचा स्वामी दत्तकृपा दिंडीतील वारकरी दिंडी पालखी मधील ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर मौजे चळे या गावातून जप्त केलेला आहे. याबाबत वेळापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 251/25 बी एम एस कलम 303/2 प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व पाण्याच्या शेतीपंपासाठी वापरणाऱ्या मोटारी एकूण पाच तसेच एक मोटर सायकल असा एकूण ११ लाख रुपये चा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे
जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर बाबत वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले उपनिरीक्षक विक्रम वाढणे सहाय्यक फौजदार शेंडगे पोलीस हवलदार घंटे पोलीस हवालदार सय्यद बालाजी कदम सुधीर शिंदे दीपक भोसले सुहास देशमुख गजानन माळी सागर गवळी चालक पोलीस कॉन्स्टेबल नदाफ गोडसे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here