इस्रायलचा सीरियाची राजधानी दमास्कसवर भीषण हल्ला

इस्रायल

दमास्कस (वृत्तसंस्था) : इस्रायलने इराणनंतर सीरियाकडे मोर्चा वळवला असून आज सीरियाची राजधानी दमास्कसवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात संरक्षण मंत्रालय आणि लष्कराचं मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे मीडल ईस्टमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. अलिकडेच इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती. मात्र अरब राष्ट्रांमधला संघर्ष कमी होताना दिसत नाही.

इस्रायलने सीरियाच्या संरक्षण मंत्रालय आणि लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. हा हल्ला ड्रोन आणि बॉम्बद्वारे करण्यात आला आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामुळे राजधानी दमास्कसमध्ये धुराचे लोट दिसत आहेत. इस्रायलने हल्ल्याची पुष्टी केली आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, आयडीएफने ड्रुझवरील हल्ल्याचा बदला घेतला आहे. आयडीएफ सैनिकांनी राजधानी दमिश्कमधील लष्कराच्या मुख्यालयावर आणि संरक्षण मंत्रालयावर थेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन्ही इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

इस्रायलने ज्या पद्धतीचा सीरियावर हल्ला केला आहे. त्यावरून युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी (१५ जुलै) इस्रायल आणि सीरियामध्ये ड्रुझ मुद्द्यावर एक करार झाला होता, परंतु २४ तासांच्या आत इस्रायलने हल्ला केला आहे.सीरियाच्या सैन्याच्या म्हणण्यानुसार, दमिश्कमधील उमय्याद चौकात इस्रायली ड्रोनने हल्ला केला आहे. हल्ल्यामुळे सीरियाला झालेल्या नुकसानीचे प्रमाण अद्याप मोजण्यात आलेले नाही. यात जीवितहानीही झाल्याचं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here