भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये एमबीए,एमसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम

भारती विद्यापीठ

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट( आयएमईडी) मध्ये एमबीए,एमसीए अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. १४ जुलै ते २१ जुलै दरम्यान इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १४ जुलै रोजी इंडक्शन प्रोग्रॅम चे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांच्या नव्या तुकडीच्या पायाभरणीसाठी विविध तज्ञांचे शैक्षणिक,कारकिर्दविषयक समुपदेशन आणि क्रीडा विषयक सत्रांचे आयोजन या कालावधीत करण्यात आले आहे.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम , भारती विद्यापीठ मेडिकल फाऊंडेशन च्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ समुपदेशक, व्याख्यात्या डॉ.पूजा मेहरा, संजीव त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केले. आयएमईडी चे संचालक डॉ. अजित मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते . उपप्राचार्य डॉ रामचंद्र महाडिक यांनी या कार्यक्रमाचे नियोजन कले.
डॉ.अजित मोरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच कारकिर्दीच्या संधींची माहिती दिली .ते म्हणाले , ‘आयएमईडी च्या प्लेसमेंट ड्राइव्हला कंपन्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे . विद्यार्थ्यांना आधुनिक जगातील अद्ययावत ज्ञान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील नवी क्षितिजे गाठण्यासाठी मार्गदर्शन घेऊन यशस्वी व्हावे ‘, भारती विद्यापीठाच्या एरंडवणे कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम चालू आहे.डॉ.सोनाली धर्माधिकारी,डॉ.प्रवीण माने,डॉ.सत्यवान हेंबाडे व व्यवस्थापनशास्त्राचे सर्व प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here