ॲण्टीजेन तपासणी दरम्यान यावल ग्रामीण रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंगची एैसी की तैसी

यावल (सुरेश पाटील) – येथील ग्रामीण रुग्णालयात यावल शहरातील अनेक सुज्ञ व्यापाऱ्यांकडूनच तसेच इतर काही नागरिकांकडून अन्टीजन तपासणी करताना सोशल डिस्टन्सिंगची एैसी की तैसी करण्यात येत आहे.
तपासणीसाठी आलेल्या व्यापारी व नागरिकांच्या या गर्दीत अनेकांनी मास्क लावलेले नव्हते. आज दिनांक 21 शुक्रवार रोजी आता सुद्धा यावेळेला गर्दी सुरू आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात गर्दी होऊ नये यासाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, यावल तहसीलदार, यावल पोलीस निरीक्षक, यांनी तातडीने लक्ष केंद्रीत करावे अन्यथा गर्दीच्या माध्यमातून कोरोना विषाणू संपूर्ण यावल शहरात पसरू शकतो, अशी चर्चा यावल शहरात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here