दोंडाईचा येथील मानाचे दादा गणपती मंडळ साध्या पद्धतीने करणार गणेशोत्सव साजरा

कोरोणामुक्तीसाठी गणरायापुढे मंडळ घालणार साकडे

दोंडाईचा (संतोष कोळी) – दोंडाईचा येथील मानाच्या श्री. दादा गणपती मित्र मंडळाची दि.28 जुलै 2020 रोजी बैठक घेण्यात आली.त्यात वरील ठराव मंजूर करण्यात आला.याप्रसंगी सर्वानुमते अध्यक्षपदी मनोज (मन्नू) रामोळे, सचिवपदी जीवन भोई ,उपाध्यक्ष सारंग निकवाडे, खजिनदार विठोबा चव्हाण यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी बैठकीला संदीप रामोळे, सुनील वाडिले,कैलासनाथ रामोळे, प्रविण रामोळे, संजय तावडे, जयेश तावडे,कमलेश रामोळे, प्रविण वाडीले,अशोक निकवाडे, महेंद्र भोई, निलेश वाडीले, सागर भोई, भरत निकवाडे, पंकज निकवाडे, दिपक मोरे, प्रदिप मोरे, आदी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीचे सुत्रसंचालन करताना जीवन भोई यांनी मंडळाच्या वतीने मागील वर्षाचा हिशेब अहवाल सादर केला.तसेच यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्यापद्धतीने साजरा करण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर केला. तसेच यावर्षी शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांची माहिती मंडळ सदस्यांना करून दिली.
यंदा मंडळ 73 वे वर्ष साजरा करीत असून मागील अनेक वर्षांपासून मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीसह जनजागृती व मोठ्या प्रमाणात सामाजिक व ज्वलंत विषयांवर प्रबोधन केले आहे. कोरोनाच्या संकटकाळातही मंडळाकडून अनेक गरीब परिवारांना धान्य वितरित करून मदतीचा हात देण्यात आला. यावर्षी श्री गणपती स्थापनेच्या दिवशी मानाचे श्री. दादा गणपती मंडळ गणरायापुढे कोरोणामुक्तीसाठी व कोरोणाग्रस्त रुग्ण लवकर बरे व्हावे यासाठी साकडे घालून श्रींचे वंदन करून प्रार्थना करणार आहे. सदर बैठकीला मंडळाचे अनेक सदस्य व गणेशभक्त उपस्थित होते. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here