सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे १५ दिवसांच्या खाजगी रजेवर जात असून, या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सोपवला आहे.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती, सोलापूर यांच्यातर्फे या ऐतिहासिक आणि गौरवास्पद क्षणी जंगम सरांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. श्री.जंगम हे एक दूरदृष्टी असलेले, शिस्तप्रिय आणि नवोन्मेषी प्रशासक असून, त्यांच्या कार्यशैलीत स्पष्टता, वेग आणि परिणामकारकता दिसून येते.
गेल्या अकरा महिन्यांपासून जिल्हा परिषद सोलापूरमध्ये सीईओ पदावर कार्यरत असताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीच्या नियोजनामध्ये ‘जंगम’ साहेब दाखवलेले उत्कृष्ट समन्वय कौशल्य आणि प्रशासनातील परिपक्वता सर्वांनी अनुभवली.
जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्याने जंगम सरांना प्रशासनातील उच्चतम पदावरील अनुभव घेण्याची संधी मिळत असून, हा विश्वास त्यांच्या कार्यक्षमतेवरच शिक्कामोर्तब करणारा आहे. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत. जिल्ह्याचे प्रशासन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्रेरणादायी ठरेल, असा आमचा ठाम विश्वास आहे.







