पिंपरी चिंचवड भागातून ६ बांगलादेशी नागरिकांना अटक

बांगलादेशी

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : देशात घुसखोरी करुन अनधिकृतरीत्या राहणाऱ्या ६ बांगलादेशी नागरिकांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक चार पोलिस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात राहणारे काही बांगलादेशी नागरिक वाकड येथील भुजबळ चौक इथून मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा क्रमांक चार पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सहा बांगलादेशी नागरिकांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मोहम्मद उस्मान शिराजून अली शेख (वय ३४ वर्ष), अब्दुल्ला सागर मुल्ला (वय २५ वर्ष), मोबीन हारून शेख (वय ३९ वर्ष), जहागीर बिलाल मुल्ला (वय ३५ वर्ष), मोहम्मद इलाहीन इलियास विश्वास (वय २२ वर्ष) आणि तोहीद मुसलेम हसन शेख (वय २६ वर्ष) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे बांगलादेशी नागरिक पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास होते. मात्र आता पोलिसांनी या नागरिकांना बांगलादेशात यशस्वी प्रत्यार्पण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here