वाळू माफियांना पकडण्यासाठी तहसीलदार सूर्यवंशी यांची नदीपात्रात उडी

तहसीलदार सूर्यवंशी

जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद पाटील) : धरणगाव तालुक्याचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी काल बुधवारी (दि. २३ जुलै) दुपारी चार वाजेच्या सुमारास वाळूमाफीयांना पकडण्यासाठी थेट नदीपात्रात उडी घेतल्याच्या थरारक प्रकार घडला आहे

याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून धरणगाव कडे परत असताना बांबरी पुलावरून त्यांना नदीपात्रात काही वाळू माफिया वाळूची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले तात्काळ त्यांनी आपले वाहन थांबवले आणि क्षणाचाही विलंब न लावता नदीपात्रात उतरले नदीत पाणी जास्त असूनही महेंद्र सूर्यवंशी यांनी जीवाची परवा न करता थेट पाण्यात उडी घेऊन पोहत पोहत दुसऱ्या किनाऱ्याकडे जाण्याच्या प्रयत्न केला.
तहसीलदारांना आपल्या दिशेने येताना आताच वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी लगेच वाळू काढण्याचे कामे थांबवले आणि येथून पडला तहसीलदार सूर्यवंशी यांनीही त्यांचा पाठलाग केला तहसीलदारांच्या या धाडसी कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे एका जबाबदार अधिकाऱ्याने दाखवलेल्या या धैर्याचे आणि कर्तव्य निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे या घटनेमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे प्रशासनाची यापुढे कोणतीही गय केली जाणार नाही असा संदेश यातून दिला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here