गया येथे अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तरुणीवर बलात्कार

rape
file photo

गया (बिहार) (वृत्तसंस्था) : होम गार्डच्या शारिरीक चाचणीदरम्यान बेशुध्द पडलेल्या तरुणीला रुग्णालयात नेलं जात असताना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालक आणि एका टेक्नीशियनला अटक केली आहे.एसएसपी आनंद कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितंल की, पीडितेने पोलिसात तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चालक विनय कुमार आणि टेक्नीशियन अजित कुमारला अटक केलीय.

धावत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दोघांनी तरुणीवर अत्याचार केला, अशी तक्रार तरुणीने दिली होती. त्यानंतर बोधगया एसडीपीओ सौरभ जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती एसएसपी आनंद कुमार यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडित तरुणी बीएमपी-३ मध्ये होमगार्ड भरतीसाठी धावण्याची परीक्षा देण्यासाठी गया येथे आली होती. दरम्यान, तिची प्रकृती बिघडली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यादरम्यान दोन तरुणांनी अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर जेव्हा मुलीला शुद्ध आली तेव्हा तिने डॉक्टरांना तिच्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली. पीडिता इमामगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावातील रहिवाशी आहे. तिने पोलिसांनी सांगितलं की, बेशुद्ध पडल्यानंतर तिला रुग्णालयात नेत असताना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ३ ते चार जण होते.
तपास पथक तयार करण्यात आल्यानंतर पथकाने घटनास्थळ गाठत तेथे पुरावे गोळा केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही आरोपींची ओळख पटवली. याप्रकरणी बोधगया येथी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून या प्रकरणी त्वरीत आरोप पत्र दाखल करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here